BhandaraCrime NewsLatest News

लग्नाचं आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भंडारा जिल्ह्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साजीद शेख आणि पीडित मुलगी यांची ओळख गेल्या तीन वर्षांपासून होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं.

३० मार्च २०२६ रोजी दुपारी आरोपीने मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यानंतर त्याने तिला मोटारसायकलवर बसवून श्रीनगर येथील एका रिसॉर्टमध्ये नेलं. रिसॉर्टमधील खोलीत नेल्यानंतर आरोपीने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्ती केली आणि दोन वेळा अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

अडयाळ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.
सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे. ही घटना पुन्हा एकदा समाजात वाढणाऱ्या अशा गुन्ह्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button