AmravatiLatest Newspolitics

अमरावतीत राजकीय भूकंप! मनसे-उबाठाचे कार्यकर्ते रवि राणा यांच्या YSP मध्ये

अमरावती शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर आज शंकर नगर येथे मोठा राजकीय प्रवेश सोहळा पार पडला!
आमदार रवि राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे आणि उबाठा गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला! या प्रवेश सोहळ्यात बबलु आठवले आणि पवन दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. नव्या कार्यकर्त्यांना YSP चे दुपट्टे परिधान करून पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.

कार्यालय परिसरात एकच जल्लोष उत्साह आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते! यावेळी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले – “युवा स्वाभिमान पार्टी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे.” “मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षात येत असल्याने
संघटन अधिक मजबूत होत आहे!”

दुसरीकडे नव्या कार्यकर्त्यांनीही स्पष्ट केलं— “रवि राणा यांच्या कार्यपद्धतीवर आणि जनहिताच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे.” “आगामी काळात शहराच्या विकासासाठी आम्ही पक्षासोबत काम करू!”

या भव्य प्रवेशामुळे अमरावतीतील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे! आणि एक गोष्ट स्पष्ट— युवा स्वाभिमान पार्टीचं बळ आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे!
“मनसे-उबाठाचे कार्यकर्ते आणि थेट YSP मध्ये एंट्री! अमरावतीच्या राजकारणात आता नवी समीकरणं तयार होणार का?
हे येणारा काळच ठरवेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button