citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये गॅस एजन्सींची मनमानी; घरगुती सिलेंडरच्या काळाबाजाराचा आरोप

नागपूर – शहरात गॅस एजन्सींच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून, अधिक पैसे घेतल्याशिवाय सिलेंडर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठीचा गॅस सिलेंडर ठराविक दराने मिळणे अपेक्षित असताना काही एजन्सी चालकांकडून तब्बल ₹२५०० पर्यंत दर आकारला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, रिकामा सिलेंडर जमा केल्यानंतरच नवीन सिलेंडर दिला जातो आणि त्यासाठीही जादा पैसे घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नाराजी अधिक वाढली आहे.

गॅस एजन्सींच्या या कथित काळाबाजारामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून, सामान्य नागरिकांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून दोषी एजन्सींवर कठोर कारवाई करून योग्य दरात गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. गॅससारख्या अत्यावश्यक वस्तूवर काळाबाजार होणे ही गंभीर बाब असून प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button