citynewsIndia NewsLatest News
तवी नदीत अंघोळीस गेलेल्या 5 मुलांपैकी 3 बुडाले; शोधमोहीम सुरू

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील नगरोटा परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. तवी नदीत अंघोळीस गेलेल्या पाच मुलांपैकी तीन मुले नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊन बुडाल्याची माहिती मिळाली आहे.
घटना घडल्यानंतर प्रशासन तातडीने सतर्क झाले असून एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) पथकांनी रात्रीच शोधमोहीम सुरू केली. बचाव पथकांनी बराच वेळ मुलांचा शोध घेतला, मात्र अंधार वाढल्यामुळे उशिरा रात्री ही मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली.
आज सकाळी पुन्हा सूर्योदयासोबत शोधमोहीम सुरू करण्यात आली असून बचाव पथके पूर्ण क्षमतेने बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थही घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लवकरात लवकर मुलांचा शोध लागावा अशी प्रार्थना केली जात आहे.



