citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात पोलिसांची धडक कारवाई; कुख्यात ‘चिऱ्या’ शेख अटकेत, धिंड काढत दिला कडक संदेश

नागपूर (प्रतिनिधी):
नागपूर शहरातील शांतीनगर आणि यशोधरा नगर पोलीस परिमंडळात पोलिसांनी धडक कारवाई करत कुख्यात गुन्हेगार वसीम उर्फ ‘चिऱ्या’ शेख याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

२७ मार्च रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून फरार असलेल्या ‘चिऱ्या’ला ताब्यात घेतले. तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अटक केल्यानंतर पोलिसांनी केवळ त्याला कोठडीत न ठेवता, परिसरात त्याची धिंड काढत गुन्हेगारांना कडक इशारा दिला. तसेच आरोपीच्या घराची आणि तो ज्या ठिकाणी वावरत होता त्या अड्ड्यांची सखोल झडतीही घेण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दोन्ही पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक बडगा कायम राहणार,” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button