Amaravti GraminLatest NewsMaharashtraSocial News

कावली येथे मार्गशीर्ष त्रयोदशीनिमित्त अखंड भजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

धामणगाव रेल्वे – तालुक्यातील कावली गावात मार्गशीर्ष त्रयोदशीनिमित्त आयोजित करण्यात आलेला दोन दिवसांचा अखंड भजन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान – तनाची झोपडी येथे तब्बल ४८ तास अखंड सुरू असलेल्या या भजन सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.

बुधवारी पहाटे चौघड्याच्या वेळी अवधूत भजनाची मांड बसवून जागरणास सुरुवात करण्यात आली. सलग ४८ तास भजन, नामस्मरण व जयघोष सुरू राहिल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. गुरुवारी महाराजांच्या विधीवत पूजनानंतर सामूहिक आरती पार पडली.

यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. कावली येथील श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान – तनाची झोपडी हे अवधूत महाराजांचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.

यंदाही मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आयोजित अखंड भजन सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे प्रमुख माधव शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button