AchalpurcitynewsLatest NewsMaharashtra
शिवसेनेचा मोठा निर्णय! अचलपूर नगरपालिका, 29 वार्डात शिवसेनेची तयारी”

आजच्या भव्य आढावा बैठकीत, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी अचलपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या बैठकीत माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार धाने पाटील आणि शिवसेना अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष एडवोकेट प्रमोद सिंह गड्रेल यांची उपस्थिती होती. अचलपूर नगराध्यक्ष पदासाठी सौ रेखा जीयालाल गड्रेल यांचे नाव घोषित करण्यात आले, तसेच 41 वार्डांपैकी 29 वार्डांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला गेला.”
“धाने पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला, तर माजी खासदार अडसूळ यांनी 2016 च्या निवडणुकीत भगवा फडकवला होता, अशी आठवण करून दिली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रासाठी शिवसेनेची तयारी जोरात सुरू आहे, आणि लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल.”



