Latest NewsMaharashtra

शिराळा शेतशिवारात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला

वलगाव-चांदूरबाजार महामार्गावर असलेल्या शिराळा शेतशिवारात आज सकाळी एका युवकाचा जळालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्राचे वार आढळले असून हातावर गोंदवलेलं नाव देखील पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आहे.
शेतात काम करण्यासाठी आलेल्या शेतमजुरांना हा मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून प्राथमिक तपासानुसार ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचं समोर येतंय. या प्रकरणी डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस विविध तपासाच्या दिशा शोधत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button