क्षत्रिय कलाल समाजातर्फे भगवान सहस्त्रबाहु भगवानाचा जन्मोत्सव
धारणी तालुक्यातील बालाजी मंगलम येथे क्षत्रिय कलाल समाजातर्फे भगवान सहस्त्रबाहु अर्थात सहस्त्रार्जुन भगवानाचा जन्मोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान सहस्त्रार्जुन यांच्या पूजन व आरतीने झाली. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्सवाचा आनंद लुटला. या प्रसंगी समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा आणि समाजहितासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात समाजातील ऐक्य, संघटन आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी राजकिशोर मालवीय तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश मालवीय, अनिल मालवीय, हरेराम मालवीय, मनोहरलाल चौकसे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कलाल समाजातर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं, ज्यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात अजयकुमार मालवीय आणि मनोहरलाल चौकसे यांनी समाजाच्या शिक्षण आणि एकतेच्या गरजेवर भाष्य केलं. भगवान सहस्त्रबाहु जन्मोत्सवाने धारणी परिसरात भक्तीभाव, सामाजिक ऐक्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.



