एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! आता 90 दिवस प्रवास, फक्त 60 दिवसांचे पैसे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.
एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बसेस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.
मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे -अलिबागसारख्या मार्गावर मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी तसेच ई-बसेस सेवा आहेत. योजनेमुळे प्रवाशांचा फायदा होईल.
काय आहे ही योजना?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना 60 दिवसांचे भाडे भरून 90 दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.
कोणत्या बससाठी पास उपलब्धः 9 मीटर ई-बस, 12 मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)
मासिक पास (30 दिवस): 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन 30 दिवस वैध
त्रैमासिक पास (90 दिवस): 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन 90 दिवस वैध
काय फायदा होणार?
उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकती. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक 100 टक्के दराने भरावा लागणार आहे.
१) एसटी महामंडळाने ई-बससाठी नवी पास योजना काय सुरू केली आहे?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला प्रतिसाद मिळवण्यासाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत नियमित प्रवाशांना सवलतीनुसार पास उपलब्ध होणार आहेत.
२) या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
नोकरी किंवा व्यवसायासाठी दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे ई-बस सेवेचा वापर वाढेल आणि प्रवाशांना फायदा होईल.
३ ) या योजनेबाबत कोणाने माहिती दिली?
एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ई-बस ताफ्यातील बसांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस आहे.



