AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची विविध शिबीरांकरिता निवड

केंद्र व राज्य स्तरावर करणार विद्यापीठाचे प्रतिनिधित्व

अमरावती – (दि. 26.09.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत येणा-या पाचही जिल्ह्रांमधील महाविद्यालयातील 180 विद्यार्थी – विद्यार्थीनी स्वयंसेवकांची विविध शिबीरांकरिता निवड करण्यात आली आहे. निवड झालेले विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

                राष्ट्रीय गणतंत्र दिन पथसंचलन शिबीर, राष्ट्रीय एकात्मता शिबीर, राष्ट्रीय साहसी शिबीर, राज्यस्तरीय आव्हान शिबीर, राज्यस्तरीय गणतंत्र दिन पथसंचलन शिबीर, राज्यस्तरीय साहसी शिबीर, राज्यस्तरीय उत्कर्ष शिबीर, राज्यस्तरीय प्रेरणा शिबीर अशा विविध शिबिरांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थीनींची निवड चाचणी घेण्यात आली. अमरावती जिल्ह्रासह अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्हास्तरीय शिबिरामधून शारीरिक सक्षम गटातून 90 विद्याथ्र्यांची तसेच सांस्कृतिक गटातून 90 विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली होती. जिल्हास्तरावर निवडलेल्या स्वयंसेवकांची विद्यापीठस्तरीय निवड चाचणी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अमरावती जिल्हा समन्वयक डॉ. विशाल गजभीये, डॉ. विकास देशमुख, यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ. निलिमा दवणे, परीक्षक म्हणून लेफ्टनंट डॉ. रोहीतकुमार अग्रवाल, श्री वृषभ डहाके, डॉ. नेत्रा मानकर, डॉ. अंकुश गिरी, प्रा. अमोल अढाऊ, डॉ. वनिता भोपत उपस्थित होते.  कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी याप्रसंगी सर्व पात्र विद्याथ्र्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

                विद्यापीठस्तरीय निवड चाचणीमध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांमधून 180 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले. सर्वांची दोन गटांमध्ये विभागणी करुन शारीरिकदृष्टया सक्षम गटाची विद्यापीठाच्या क्रिडांगणावर वजन, उंची, छाती, धावणे, परेड, पुलअप्स, सीटअप, चीनअप, अशा शारीरिक चाचणी घेवून केंद्र व राज्य शासनाच्या गणतंत्र दिन पथसंचलन शिबीरासाठी 12 मुले, 12 मुली, राष्ट्रीय साहसी शिबीरासाठी 2 मुले, 2 मुली, राज्यस्तरीय आव्हान शिबीरासाठी 75 मुले, 50 मुली व  राज्यस्तरीय साहसी शिबीरासाठी 5 मुले, 5 मुलींची विद्यापीठामार्फत निवड करण्यात आली. परिक्षक म्हणून लेफ्टनंट. डॉ. रोहीतकुमार अग्रवाल व वृषभ डहाके यांनी काम पाहिले.

                सांस्कृतिक गटामध्ये सहभागी विद्याथ्र्यांनी विद्यापीठाच्या डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र येथे आपल्या उत्कृष्ट कला – कौशल्याचे सादरीकरण केले. यामधून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी 9 मुले, 9 मुली, राज्यस्तरीय प्रेरणा शिबीरासाठी 5 मुले, 5 मुली, राज्यस्तरीय उत्कर्ष शिबीरासाठी 9 मुले, 9 मुलींची निवड करण्यात आली. परिक्षक म्हणून डॉ. अंकुश गिरी, प्रा. अमोल अढाऊ, डॉ. नेत्रा मानकर, डॉ. वनिता भोपत यांनी काम पाहिले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू, संचालन डॉ. हर्षाली वानखडे,  तर आभार जिल्हा समन्वयक डॉ. विशाल गजभिये यांनी मानले. निवड झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button