Latest NewsMaharashtra

नवीन राजकीय वळण: युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा धाडसी निर्णय, नेत्यांना दिले खास आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात चर्चा रंगल्या असताना अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. मनसे आणि शिवसेना बालेकिल्ल्यात समान जागा वाटून घेणार आहे. दरम्यान उर्वरित महानगरासाठी 60:40 चा फॉर्म्युला स्वीकारण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

जागांची यादी तयार करण्याचा आदेश
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे आता जवळपास निश्चित झालं असून फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जागांच्या यादी तयार करण्यास सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

दिवाळीत जाहीर होणार युती?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या युतीची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील औपचारिक युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते, जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. तसंच शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यातही ही घोषणा केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.

31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने यादरम्यान 4 आठवड्यात लागणारा स्टाफ त्यांना द्या, नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणाऱ्या सगळ्या EVM मशिन्स द्या असाही आदेश दिला आहे.

4 आठवड्यात लागणारा स्टाफ आणि नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणाऱ्या सगळ्या EVM मशिन्स द्या असा आदेश कोर्टाने दिला आहे. इतर मशिन्स इतर राज्यातून घेण्यासाठी ऑर्डर दिली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वकिलांनी सुनावणीच्या सुरुवातीला सांगितलं की, 65 हजार मशिन्स आहेत, 55 हजार मशिन्स आणखी हव्यात. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी हा सगळा वेळकाढूपणा सुरू आहे असं सांगितलं.

एवढा उशीर करण्याची काहीही गरज नव्हती. याचिकाकर्ते असंच करत राहिले तर निवडणुका 2026 पर्यंत पण हे करणार नाहीत असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत, कारण ओबीसी आणि इतर प्रकरणं आली असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. कोर्टाने यावेळी आम्हाला चार महिन्यात निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा होती असं सांगितलं. आम्हाला वाटत होतं की या महिन्याच्या शेवटी निवडणुका होतील असंही कोर्टाने म्हटलं.

१. ठाकरे बंधूंची युती का महत्त्वाची आहे?
शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (बीएमसी २०२५) युती होण्याची शक्यता आहे. ही युती ठाकरे घराण्यातील दोन बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणे बदलू शकते. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर (जसे हिंदी सक्ती विरोध) दोघे एकत्र आले असून, यामुळे बीजेपी-शिंदे गटाला आव्हान मिळू शकते. युती झाल्यास मुंबईतील मराठी मतदारांचा फायदा होईल, पण मनसेचा निवडणुकीतील इतिहास मर्यादित असल्याने फायदा किंवा तोटा याबाबत चर्चा आहे.

२. जागावाटपाचा फॉर्म्युला काय आहे?
सूत्रांनुसार, मुंबईच्या बालेकिल्ल्यात (कोर एरिया) शिवसेना (यूबीटी) आणि मनसे समान जागा वाटून घेतील (५०:५०). उर्वरित मुंबईसाठी ६०:४० चा फॉर्म्युला स्वीकारण्याची शक्यता आहे, ज्यात शिवसेना (यूबीटी) ला ६०% आणि मनसेला ४०% जागा मिळतील. ठाणे महानगरपालिकेसाठी वेगळा समतोल असू शकतो, कारण ठाण्यात शिंदे गटाचे वर्चस्व आहे. जागांची यादी तयार करण्याचे आदेश दोन्ही पक्षांच्या नेत्यांना देण्यात आले आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button