Uncategorized

गोंड वाघोली नंतर जवलापूरमध्ये वाघ किंवा बिबट्याचे ठसे, गावात भीतीचे वातावरण!

अमरावती जिल्ह्याला लागून असलेल्या गोंड वाघोली, कुणबी वाघोली आणि पायवीर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली होती. स्थानिकांनी वाघ पाहिल्याचा दावा केला होता, तर काही पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याचेही समोर आले होते. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम पायवीर येथील शेतात पोहोचली. त्यांनी केलेल्या तपासणीत जमिनीवर पावलांचे ठसे आढळले. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, हे ठसे वाघाचे नसून बिबट्याचे आहेत. मात्र, स्थानिक नागरिक अजूनही हा वाघच असल्याच्या मतावर ठाम आहेत.

ही चर्चा सुरू असतानाच, आता पथ्रोट हद्दीतील जवलापूर शिवारातही असेच ठसे सापडल्याने परिसरातील भीती आणखी वाढली आहे. जवलापूर येथील पोलीस पाटील यांनी तातडीने याची माहिती तलाठ्यांना दिली. आता हे ठसे वाघाचे आहेत की बिबट्याचे, हा प्रश्न कायम आहे. परंतु, वाघ असो किंवा बिबट, हा एक हिंसक प्राणी असल्याने संपूर्ण भागात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांकडून वन विभागाला लवकरात लवकर या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button