City CrimeLatest News

एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न, आरोपी रंगेहात पकडला

नागपूर : कपिल नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास, एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलं. एटीएम मशीनमध्ये घुसून चोरी करण्याचा आरोपीचा डाव पोलिसांच्या दक्षतेमुळे फसला.
या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत आरोपीने इतर एटीएम चोऱ्यांमध्ये सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईबद्दलची अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे की, वेळेवर झालेल्या पोलिस कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button