AmravatiLatest News

बडनेरा परिसरात प्लास्टिक व डस्टबिनविषयी मोहिम; ११ हजारांचा दंड वसूल

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आज दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी दक्षिण झोन क्रमांक ४ अंतर्गत बडनेरा प्रभाग क्र. २२ नवी बस्ती परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ही कारवाई आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत झोन कार्यालय रोड ते शिवाजी चौक परिसरातील किरकोळ भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून १ किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आली. परिसरातील सर्व आस्थापनांना प्लास्टिक पन्नीचा वापर न करण्यास तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवण्यासाठी दोन डस्टबिनचा वापर बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जनजागृतीही करण्यात आली.
स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १२ आस्थापनांकडून डस्टबिन नसल्याने प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारून एकूण ६,००० रुपये वसूल करण्यात आले. तसेच एका आस्थापनात प्लास्टिक कॅरीबॅग आढळल्याने त्या आस्थापनावर ५,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारे एकूण ११,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वच्छता निरीक्षक एम.ए. ढेंडवाल, सुमेध मेश्राम व बिट जमादार राजू बग्गन, बाळू उसरे यांची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना स्वच्छतेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील कारवाई अधिक कठोर केली जाणार आहे, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button