Crime NewsLatest NewsNanded

नांदेड: पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नी आणि प्रियकराला अटक

नांदेड: पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथे घडली आहे. या आगीत गंभीररित्या भाजलेल्या आनंदा जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कुंडलवाडी पोलिसांनी आनंदा जाधव यांच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्र प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जापूर येथील आनंदा जाधव हे पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्रस्त होते. यातूनच त्यांनी अखेरचे पाऊल उचलत स्वतःला जाळून घेतले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर कुंडलवाडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आनंदा जाधव यांच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीअंती आनंदा जाधव यांच्या आत्महत्येमागे पत्नीचे अनैतिक संबंध हेच कारण असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांवरही आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी : मनोज मनपुर्वे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button