Latest NewsNanded

नांदेड मध्ये बापाने विकली आठ वर्षांची मुलगी, आईची पोलिसांत तक्रार

नांदेड : नोकरी जाण्याची भीती आणि पैशाच्या मोहापायी एका बापाने आपलीच जुळी मुलगी विकल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी गजानन वांजरखेडे हे हिंगोली येथील दुय्यम निबंध कार्यालयात अनुकंपावर शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्याने आपल्या एका जुळ्या मुलीचा सौदा केल्याचा आरोप त्याच्या पत्नी सुरेखा वांजरखेडे यांनी केला आहे. पीडित मुलगी केवळ ८ वर्षांची आहे.

सुरेखा वांजरखेडे यांच्या मते, त्या आणि आरोपी गजानन यांच्यात गेल्या आठ वर्षांपासून वेगळं वास्तव्य आहे. दरम्यान, गजाननला मागील वर्षी अनुकंपाच्या आधारे शासकीय नोकरी मिळाली. त्यानंतरच या विक्री प्रकरणाचा तपशील समोर आला.

मुलीचा सौदा देविदास जोशी नावाच्या व्यक्तीशी झाला असून, तो एक पुजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गजानन वांजरखेडे आणि देविदास जोशी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या पीडित मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून, तिला एका सेवाभावी संस्थेत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. “माझ्या मुलीला परत मिळावं, तिचं संगोपन मीच करीन,” अशी भावनिक मागणी मुलीच्या आईने केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button