Amaravti GraminAmravatiLatest News

बडनेरा प्रभाग २२ मध्ये प्लास्टिक जप्ती मोहिम; २० हजारांचा दंड वसूल

अमरावती : मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि बडनेरा झोन क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २२ (नवी वस्ती परिसर) मध्ये प्लास्टिक जप्ती आणि डस्टबीन जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण २०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून सुमारे ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

तपासणी केली ३० आस्थापनांची
मोहिमेदरम्यान ३० किरकोळ विक्रेत्यांची व व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यातील काही व्यवसायिकांनी बंदी असूनही प्लास्टिकचा वापर केल्याचे आढळून आले. परिणामी त्यांच्याकडून रोख दंड वसूल करण्यात आला.

एकदाच वापरणाऱ्या प्लास्टिकवर केंद्र सरकारची बंदी
एक जुलै २०२२ पासून भारत सरकारने एकदाच वापरणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू केली आहे. तरीही प्रत्यक्षात अनेक भागांत त्याचा वापर सुरूच असल्याचे दिसते. अशावेळी अशा मोहिमा गरजेच्या ठरत आहेत, मात्र उत्पादकांवर कारवाईची टाळाटाळ प्रशासनाकडूनच होत असल्याने सामान्य व्यापार्‍यांवरच थेट कारवाई केली जात असल्याबाबत संभ्रम निर्माण होतोय.

पथकाची उपस्थिती
या कारवाईत सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चवरे, व्ही.डी. जधे, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाणे, मेघराज ढेंडवाल, बिट पिऊन बग्गन व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रश्न कायम – उत्पादक मोकाट, व्यापाऱ्यांवर कारवाई?
सरकारकडून प्लास्टिक निर्मितीवर बंदी असली तरी प्रत्यक्षात उत्पादकांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. अशा वेळी किरकोळ व्यापाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवायांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button