AmravatiLatest News

अमरावती महानगरपालिकेची मोठी कारवाई: अतिक्रमण हटवण्यात ६ ट्रक साहित्य जप्त

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दिनांक १७ जुलै,२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून रात्री ८.३० वाजेपर्यंत मध्य झोन क्र. २ राजापेठ व पूर्व झोन क्र. ३ दस्तूरनगर परिसरात मोठी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त (प्रशासन) डॉ. मेघना वासनकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई अतिक्रमण विभागाद्वारे करण्यात आली.

सदर कारवाई दरम्यान जुने रेल्वे स्टेशन समोरील मंगलम हॉटेलपासून खापर्डे बाग, बस स्टॅन्ड डेपो, पोलीस पेट्रोल पंप, मालटेकडी परिसरातील ज्यूस हातगाड्या, पाणीपुरवठा विभाग कार्यालय, जिल्हा परिषद कॉटर, काँग्रेस भवन समोर, रंगाळा ते राजेंद्र कॉलनी रोड तसेच रुक्मिणीनगर रोड ते सायन्सस्कोर मैदान या परिसरातील सर्व अतिक्रमण हटवण्यात आले.

यामध्ये चायनीज व ज्यूस हातगाड्या, लोखंडी पानठेले, दुकानदारांनी बाहेर टाकलेले शेड आदी साहित्याचा समावेश होता. एकूण ६ मोठे ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, श्री. शहेबान, पोलीस अधिकारी श्री. हिरुडकर तसेच अतिक्रमण कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.

महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये शिस्तीचा संदेश गेला असून, भविष्यात अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button