AmravatiLatest News

“रहाटगाव येथे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते वृक्षारोपण”पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – ‘मिशन ग्रीन अमरावती’ उपक्रम

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या ‘मिशन ग्रीन अमरावती’ उपक्रमांतर्गत आज रहाटगाव येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरण रक्षण व हरित नागरीकरणाच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी स्वतः झाड लावून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
“वृक्षारोपण हे केवळ एक उपक्रम नाही, तर आपल्या भविष्यासाठी केलेली महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे,” असे प्रतिपादन आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी यावेळी केले. त्यांनी नागरिकांना दरवर्षी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास मनपाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नागरिक व मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम ‘हरित शहर – स्वच्छ शहर’ या मोहिमेचा एक भाग असून, महानगरपालिकेच्या पुढील योजनांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. झाडे लावणे, त्यांचे संरक्षण करणे व त्यांची जबाबदारी घेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्‍त धनंजय शिंदे, उपअभियंता आशिष अवसरे, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, निरीक्षक श्रीकांत गिरी, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्याव, इतर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button