Latest NewsNanded

नांदेडजवळ एसटी बस पलटी: १०-१२ जण जखमी, शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यामध्ये चिकना फाट्याजवळ नरसीहून धर्माबादकडे जाणारी एक एसटी बस पलटी झाली. या भीषण अपघातात अंदाजे १० ते १२ प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जात असताना अचानक समोर आलेल्या एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यावरून खाली उतरून पलटी झाली. या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना धर्माबाद येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अपघाताच्या पुढील चौकशी सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button