महापालिकेच्या आरोग्य नियामक समितीची पहिली सभा पार पडली; PCPNDT कायद्याबाबत कठोर निर्देश
अमरावती : अमरावती महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यासाठी (PIP 2025-26) प्रशासकीय मान्यतेसंदर्भात नियामक समितीची पहिली सभा दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आरोग्य व्यवस्थापनासंबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत सर्व सोनोग्राफी सेंटरना आपले सर्व रेकॉर्ड पूर्णपणे अद्यावत ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) चालू योजनांचा आढावा घेत, आगामी नियोजनावर व्यापक चर्चा करण्यात आली.
- बैठकीत उपस्थित मान्यवर:
सौम्या शर्मा चांडक – आयुक्त, अमरावती महानगरपालिका - शिल्पा नाईक – अतिरिक्त आयुक्त
- डॉ. मेघना वासनकर – उपायुक्त (प्रशासन)
- डॉ. पुनम बेलोकार – अध्यक्ष, अमरावती ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी सोसायटी
- डॉ. संदीप दानखडे – PCPNDT सल्लागार समिती
- डॉ. प्रांजल शर्मा
- अॅड. शशिकीरण पालोड – सहाय्यक सरकारी वकील
- डॉ. ललिता लोखंडे – सचिव, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी सोसायटी
- डॉ. विशाल काळे – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
शहरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी
या बैठकीत PCPNDT कायद्याचे पालन, शहरातील आरोग्य केंद्रांच्या यंत्रणा आणि स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.
महानगरपालिकेच्या या नियामक समिती बैठकीमुळे अमरावती शहरातील आरोग्य सेवांना नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



