AmravatiLatest News

श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात 763 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण

अमरावती: श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण 763 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आलं. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम नव्या पिढीच्या यशाचा, संकल्पाचा आणि प्रेरणाचा सोहळा ठरला…

शुक्रवारी सकाळी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा उत्सवमूर्ती वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते विधानसभा सदस्य सुलभा खोडके, तर प्रमुख उपस्थिती होती विधानपरिषद सदस्य संजय खोडके, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य प्रा. डॉ. आर. डी. सिकची, छात्रालय समिती अध्यक्ष गणेशदास राठी, सचिव डॉ. गोविंद लाहोटी, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संत गाडगे बाबांचे भजन गीत याने झाली. उपस्थित मान्यवरांचा मोमेन्टो, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. भांगडिया यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन दिलं तर आमदार सुलभा खोडके यांनी “डिग्री फक्त दाखवण्यासाठी नको, आयुष्यात प्रगतीसाठी ती वापरावी” अशा शब्दांत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. त्याचबरोबर, अमरावतीत IT कंपन्या आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असं आश्वासन त्यांनी दिलं. हा पदवी समारंभ केवळ प्रमाणपत्र वितरण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गती देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला!

हा पदवी समारंभ नव्या सुरुवातीचा संकेत देतो. शिक्षण केवळ सन्मान नव्हे, तर जबाबदारीदेखील असते, हे आजच्या समारंभातून उमटलं. विद्यार्थ्यांना यशाची पायरी गाठताना समाजासाठीही कार्य करता यावं, हीच अपेक्षा सगळ्यांकडून आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button