khamgaon

  • Amravati

    गो. से. महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

    खामगाव : स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे भव्य राज्यस्तरीय…

    Read More »
  • Amravati

    गो. से. महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

    खामगाव::- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 रोजी  सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त “जागर स्त्री पुरुष समानतेचा” हा…

    Read More »
  • Amaravti Gramin

    गो. से. महाविद्यालय, खामगावच्या १० विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड इंटरशिप साठी निवड

    खामगाव:- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रथमच किरण अकॅडमी पुणे मार्फत इंटिग्रेटेड इंट्रनशिप आणि प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात…

    Read More »
  • Amravati

    श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त शंकर नगर, खामगाव येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

    श्री संत गजानन महाराज मंदिराचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्ष खामगांव :- श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, खामगांव यांच्या वतीने शंकर नगर (यशोधरा नगर), खामगांव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिर प्रांगणात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी कलश पूजन व वीणा प्रारंभाने होणार असून त्याच दिवशीपासून श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा रविवार दि. ०१ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होणार असून दुर्गा सप्तपदी महिला मंडळ, यशोधरा नगर तसेच महालक्ष्मी भजन मंडळ, गजानन कॉलनी हे भजन सादर करणार आहेत. निर्माणाधीन मंदिरातील माँ दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. महादेव महाराज, पोरज यांच्या वाणीतून होणार असून त्याच दिवशी दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात दररोज सायंकाळी ८ वाजता कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. भारतीताई गजानन धोटे (पारखेड), सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पवन महाराज चहाटे (अंजनगांव सुर्जी), मंगळवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पंढरी महाराज डिघोळे (जवळा बु.), बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्योतीताई रमेश काळे (शिंगाळे), खामगांव, गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. कैलास महाराज मोरखडे (अटाळी) तसेच शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. नाना महाराज पजई (खामगांव) हे कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत. या कीर्तन कार्यक्रमांना आचार्य ह.भ.प. महादेव महाराज (घोरज) यांचे मार्गदर्शन लाभणार असून गायनाचार्य म्हणून ह.भ.प. श्रीराम महाराज अंजनसांडे व ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वरखेडे तसेच मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. सोपान महाराज अंजनसांडे सहभागी होणार आहेत. उत्सव काळात दररोज सकाळी ५ वाजता काकडा ह.भ.प. मोतीराम महाराज, गवंढळा व ह.भ.प. शिंदे महाराज, पिंप्री यांच्या वाणीतून होणार असून दररोज सायंकाळी ६ वाजता हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी भक्तिभावाने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, खामगांव, शंकर नगर (यशोधरा नगर), खामगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Read More »
  • Amravati

    गो. से. महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान

    खामगांव:- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा…

    Read More »
  • Amravati

    गो. से. महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय विद्यार्थी उत्पादन प्रदर्शनी व विक्री यशस्वी

    प्रदर्शनीला खामगावकरांचा उदंड प्रतिसाद, सौ. श्रद्धाताई बोबडे यांनी मानले खामगावकरांचे आभार खामगाव :- स्व. नरेंद्रजी उपाख्य बाबासाहेब बोबडे (माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद खामगाव…

    Read More »
  • Amaravti Gramin

    अकोला शाखा (WIRC) आयसीएआय तर्फे गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे लेखा संग्रहालयाचे उद्घाटन

    खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी The Institute…

    Read More »
  • Amaravti Gramin

    खामगाव :- गो. से. महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

    विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. भुतेकर, प्रा. उमेश खंदारे, प्रा. अमित शिंदे व प्रा. डॉ. टकले उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा व चारित्र्यनिर्मितीच्या विचारांवर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम व दूरदृष्टीपूर्ण मातृत्वावर प्रकाश टाकला. “अपयश अंतिम नसते, जोपर्यंत प्रयत्न थांबत नाहीत,” असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. भुतेकर सर यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना आत्मबळ देतात, तर राजमाता जिजाऊंचे जीवन त्याग, संस्कार व राष्ट्रसेवेची प्रेरणा देते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केली. यावेळी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला व निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव सन्माननीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनल कळस्कर हिने केले तर कु. धनश्री हिने आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

    Read More »
  • Amravati

    खामगावात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ पथनाट्यातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी जागर

    गो. से. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समाजप्रबोधनात्मक उपक्रम खामगाव:- आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, मानसिक व शारीरिक शोषण याविरोधात समाजात व्यापक…

    Read More »
  • Amravati

    ‘करिअर कट्टा’ अंतर्गत राज्यस्तरीय Faculty Development Program चे यशस्वी आयोजन

    खामगाव : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर…

    Read More »
Back to top button