Latest News

  • नागपूर – महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

    महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपुरात आज, सोमवार ८ डिसेंबरपासून सुरू झाले असून १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सलग ७ दिवसांचे हे अधिवेशन…

    Read More »
  • धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिहेक्टरी वीस हजार बोनस’ जाहीर करा – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

    अवकाळी पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान; शेतकरी आर्थिक संकटातआ.मुनगंटीवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्याची व्यक्त केली अपेक्षा चंद्रपूर – अवकाळी पावसाने…

    Read More »
  • गोवा अरपोरा नाईट क्लबमध्ये भीषण स्फोट; २५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

    गोवा : अरपोरा परिसरातील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या भयावह…

    Read More »
  • गो. से. महाविद्यालयात रासेयो तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

    खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारवंत आणि समाजक्रांतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा समाजावर झालेला प्रभाव, त्यांचे शिक्षणाविषयीचे धोरण, महिलांच्या उन्नतीसाठीची त्यांची भूमिका आणि आधुनिक भारताच्या घडणीत त्यांनी बजावलेली भूमिका विस्ताराने स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाला परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले. त्यांनी शोषित-वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय लोकशाही अधिक सक्षम झाली आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचे पालन करून समाजप्रबोधनात सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. टी. अढाऊ यांनी केली. त्यांनी रासेयोच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सामाजिक बांधिलकीची माहिती देत विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणजे संघर्ष, ज्ञान आणि आत्मबळाचा अद्वितीय प्रवास आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांची गाठ धरून पुढे जायला हवे.” कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुभाष वाघ, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. नीता बोचे यांच्यासह सर्व विभागांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. उमेश खंदारे, प्रा. विक्रम मोरे, प्रा. डॉ. महेश गायकवाड, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. डॉ. बाळासाहेब टकले, प्रा. संगीता वायचाळ, प्रा. टापरे, प्रा. जगताप, प्रा. ढाले, प्रा. मोगल, प्रा. खरात मॅडम, प्रा. कदम मॅडम, प्रा. कोल्हे मॅडम, प्रा. पाटील मॅडम यांनी कार्यक्रमातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय कामात सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुभाषजी बोबडे आणि सचिव आदरणीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच महाविद्यालयात अशा समाजाभिमुख आणि मूल्याधिष्ठित कार्यक्रमांना सातत्य मिळत असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु. दीक्षा खोडे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. सोनाली कळसकार यांनी केले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजातील सकारात्मक बदलासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

    Read More »
  • जगातील सर्वोत्तम संस्कृती भारतीय संस्कृती — मोनाली नरेंद्र बोबडे यांचे विचार विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारे

    विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे ’परदेशातील वास्तव्य’ या विषयावर आयोजित व्याख्यान अत्यंत माहितीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण, संस्कृती, जीवनशैली आणि रोजगाराच्या संधींबद्दल सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. एस. डी. वाघ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रित मोनाली नरेंद्र बोबडे आणि निसर्ग संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय नीताताई बोबडे या मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. डी. कायपेल्लीवार यांनी करताना आजच्या जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन सत्रांची गरज अधिक असल्याचे स्पष्ट केले. मोनाली ताई बोबडे यांनी आपल्या प्रभावी व आकर्षक व्याख्यानातून परदेशातील जीवनशैली, शैक्षणिक प्रणाली, सांस्कृतिक मूल्ये आणि रोजगाराच्या विविध संधी याचा विस्ताराने ऊहापोह केला. त्यांनी भारतातील संस्कृती ही जगातील सर्वोत्तम संस्कृती असून भारतीय मूल्ये, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी ही देशाची खरी ओळख असल्याचे अधोरेखित केले. परदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणप्रणाली, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी–मैत्रीपूर्ण वातावरण आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी याबद्दल अत्यंत सोप्या व वास्तववादी भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी परदेशातील आव्हाने आणि संधी यांचा संतुलित आढावा विद्यार्थ्यांसमोर ठेवला. त्यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठीचे योग्य नियोजन, आवश्यक कौशल्ये, भाषिक प्राविण्य, शैक्षणिक तयारी आणि व्हिसा प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्टता मिळाली. नीताताई बोबडे यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाशी असलेले नाते हे मानवी जीवनाचे खरे बळ असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही केवळ जबाबदारी नसून भविष्यासाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अर्चना कुलकर्णी यांनी करताना असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अशोक ढाले, प्रा. योगेश टापरे, प्रा. आदर्श जगताप, प्रा. श्वेता कदम, प्रा. पल्लवी खरात, डॉ. रोहिणी धरमकार, प्रा. धीरज मोहिते, प्रा. विनोद डाबरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यश मोरे यांनी सहकार्य केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जागतिक दृष्टीकोन, करिअर नियोजनाची जाणीव आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाला. परदेशातील संधी आणि भारतीय मूल्यांची सांगड घालून योग्य दिशा निवडण्याचा दृष्टिकोन या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्याचे समाधान महाविद्यालयीन वर्तुळातून व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासात मोलाची भर घालत एक स्मरणीय आणि प्रेरणादायी ठसा उमटवला. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

    Read More »
  • विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेस आयोजित‘बिझिनेस प्लॅन’ ला नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    विद्याथ्र्यांनो, नोकरी घेण्यापेक्षा देणारे व्हा-डॉ. अजय लाडअमरावती : उदयोन्मुख तरुणांनी नोकरी घेणा-यापेक्षा देणारे व्हा, असे आवाहन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य…

    Read More »
  • धावडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

    धावडा, (भोकरदन तालुका) : भोकरदन तालुक्यातील धावडा या गावात आज, ६ डिसेंबर रोजी, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…

    Read More »
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्यपूर्तीचा संकल्प करावा – कुलसचिव डॉ. अविनाश असनारे

    विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न अमरावती :   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट संविधान या देशाला प्रदान करुन…

    Read More »
  • श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकामध्ये महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    अमरावती : शहरातील मार्डी रोडवरील श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकामध्ये महापरिनिर्वाण दिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

    Read More »
  • पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बास्केटबॉल (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

    अमरावती – लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट¬ुट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वालियर येथे 23 ते 27 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर…

    Read More »
Back to top button