citynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिमचा ऐतिहासिक पद्मतीर्थ तलाव लाखो दिव्यांनी उजळला; कार्तिकी एकादशीनिमित्त भव्य दीपोत्सव आणि महाआरती

शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; ११ दिवे प्रज्वलित करून सामूहिक दीपोत्सव, संत-महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा

वाशिम : कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाशिम येथील ऐतिहासिक पद्मतीर्थ तलाव परिसरात भव्य दीपोत्सव आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. लाखो दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण पद्मतीर्थ परिसर उजळून निघाला होता. या भक्तिमय सोहळ्यात शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित या दीपोत्सवात प्रत्येक भाविकाने प्रत्येकी ११ दिवे प्रज्वलित करून सामूहिक दीपोत्सवात सहभाग घेतला. दिव्यांच्या प्रकाशाने पद्मतीर्थ तलाव परिसराचे विहंगम दृश्य निर्माण झाले होते.

यावेळी पद्मेश्वराची विधिवत महाआरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात संत-महंतांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. टाळ-मृदंगाचा गजर, भक्तिमय वातावरण आणि लाखो दिव्यांची रोषणाई यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

पद्मतीर्थ तलाव परिसरातील दीपोत्सवाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लाखो दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला ऐतिहासिक तलाव परिसर पाहून जणू अयोध्यानगरीच अवतरल्याचा भास होत होता.

श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेला हा दीपोत्सव वाशिमकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button