Amravati GraminAmravati PolicscitynewsCrime Newslatestnewss breakingnews

बडनेरा व्यापारी हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आठपैकी पाच आरोपी अटकेत!

व्यापाऱ्यांचा बंद मागे; डीसीपी यशवंत सोळंके, श्याम घुगे यांची व्यापाऱ्यांशी चर्चा, दुकाने सुरू करण्याचे आवाहन; तीन आरोपी अद्याप फरार

अमरावती (बडनेरा) : बडनेरा येथे व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी एकूण आठ आरोपींपैकी पाच जणांना अटक केली असून, उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.

व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून बडनेरा येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळे बडनेरा परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले होते.

दरम्यान, परिस्थितीची दखल घेत डीसीपी यशवंत सोळंके, डीसीपी श्याम घुगे आणि बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुलट यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केल्याची माहिती देत सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या. पोलिसांच्या या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेत दुकाने सुरू करण्यास सहमती दर्शवली.

या प्रकरणातील पाच अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. तर हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button