
शासकीय विश्रामगृहासह कार्यक्रमस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी
भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एका खासगी कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती राहणार असून, दुपारी दोन वाजता एमआयडीसी परिसरातील प्रियदर्शनी सूतगिरणी येथे त्यांचे आगमन होणार आहे. या अतिमहत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शासकीय विश्रामगृहासह कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या दौऱ्यामुळे यवतमाळमध्ये सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाने विश्रामगृहातील प्रत्येक खोलीसह संपूर्ण परिसराची तपासणी करत सुरक्षेची खात्री केली. विश्रामगृहाचा कानाकोपरा पिंजून काढत संभाव्य धोके तपासण्यात आले.

केवळ विश्रामगृहच नव्हे, तर एमआयडीसी परिसरातील प्रियदर्शनी सूतगिरणी येथील कार्यक्रमस्थळ आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात असून, दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यवतमाळ पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
सिटी न्यूज, यवतमाळदुर्गेश कान्हु.



