पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कौंडण्यपूर येथे ‘अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सवा’ला लावणार उपस्थिती; कार्यक्रमानंतर नागपूरकडे प्रयाण
अमरावती, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंबा रुख्मिणी महोत्सवा’ला ते उपस्थित राहणार आहेत.
प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार, पालकमंत्री बावनकुळे सकाळी ११.४५ वाजता श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. श्री अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती, श्री क्षेत्र कौंडण्यपूर यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कौंडण्यपूर येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे.



