AmravatiAmravati GramincitynewsDharnilatestnewss breakingnewsMaharashtra

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दिव्यांग व विधवा महिलांना मोफत किराणा किटचे वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मेळघाटात सामाजिक उपक्रम; बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी तालुक्यातील गरजूंना मदतीचा हात

धारणी / प्रतिनिधी :

धरती आबा, जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मेळघाट विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधव-भगिनी तसेच विधवा माता-भगिनींसाठी मोफत किराणा किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत गरजू कुटुंबांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्ती आणि विधवा महिलांना मोफत किराणा किटचे वितरण करून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मदतीचा हात देण्यात आला.

लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे जिल्हा संघटक मन्ना भाऊ दारसिंबे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू घटकांना आधार देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला गोपालजी धुर्वे, ॲड. गोविंद सावलकर (सरपंच), सूरजजी मावस्कर, सुग्रीव धुर्वे (सरपंच), रामू जावरकर (उपसरपंच), सोहनलाल जावरकर (माजी सरपंच), अनिल गायकवाड (शहर प्रमुख), प्रेमलता भिलावेकर (सरपंच), शालिनी बेठे, सोनोने सर, दिनेश मावस्कर (सरपंच), राकेश मावस्कर, सुरेश जावरकर, संजू बेठेकर, गणेश भिलावेकर, रवी पाटणकर, सतीश भिलावेकर, आसिफ शेख, रामलाल बाबा जांभेकर, शहेबलाल बाबा आपसे, सुभाष मालवीय आणि दिनेश पांडेय यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुख-दुःखात गरजूंच्या पाठीशी उभे राहून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मेळघाटातील दिव्यांग आणि विधवा महिलांना मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button