AccidentNewsAmravatiAmravati Gramincitynewslatestnewss breakingnews

अंजनगाव मार्गावर बोरवेलच्या साहित्याने भरलेला पिकअप पलटला; तीन युवक गंभीर!

समोरून अचानक मोटारसायकल आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल

परतवाडा | प्रतिनिधी

परतवाडा येथून अंजनगाव मार्गावर बोरवेलचे साहित्य घेऊन जाणारा पिकअप वाहन अचानक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. समोरून अचानक मोटारसायकल आल्याने पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात पिकअपमधून प्रवास करणारे तीन युवक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरवेलचे साहित्य घेऊन पिकअप वाहन परतवाडा येथून अंजनगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, मार्गावर अचानक समोरून मोटारसायकल आल्याने पिकअप चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे संतुलन बिघडल्याने पिकअप रस्त्यावर पलटी झाले. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अपघातात पिकअपमधील तीन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मोटारसायकलवरील व्यक्ती सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button