उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण; पदाधिकारी व अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
अमरावती प्रतिनिधी : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत शनिवारी, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक मनीष बजाज, ॲड. प्रशांत देशपांडे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्यासह प्रमोद मोहोड, विनोद गोडबोले, गणेश काकडे, भूषण खडेकार, सतीश ताथोड तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



