amravaticitynewslatestnewss breakingnews

यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळले; भाऊबीजेच्या निमित्ताने भावनिक नात्याचा प्रत्यय!

बळवंत दादा खासदार आहेत, उद्या त्यांच्यापेक्षाही मोठे पद मिळावे’, यशोमती ठाकूर यांची सदिच्छा; दरवर्षी आवर्जून घरी येत असल्याचा केला उल्लेख

अमरावती : दिवाळीच्या आनंदोत्सवानंतर भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण अमरावतीत उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी भाऊबीजेच्या निमित्ताने खासदार बळवंत वानखडे यांचे औक्षण करण्यात आले. या प्रसंगी दोघांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचा भावनिक प्रत्यय पाहायला मिळाला.

यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना औक्षण करून ओवाळणी केली. त्यानंतर त्यांनी वानखडे यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावेळी बळवंत वानखडे यांनीही यशोमती ठाकूर यांना साडी भेट देत भाऊबीजेचा सण साजरा केला. या कौटुंबिक सोहळ्याला भावनिक आणि आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बळवंत दादा आज खासदार आहेत; मात्र उद्या त्यांनी त्यापेक्षाही मोठे व्हावे, अशी माझी इच्छा आहे. ते दरवर्षी आवर्जून घरी येतात. आमच्यामध्ये एक भावनिक नाते आहे. माझा भाऊ सुखरूप आणि आनंदी राहावा, अशी प्रार्थना मी देवचरणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार बळवंत वानखडे यांनीही यशोमती ठाकूर यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना, आमचे भाऊ-बहिणीचे नाते असल्याची भावना व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्यांपलीकडे जपलेले हे कौटुंबिक नाते भाऊबीजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

बाईट :

  • बळवंत वानखडे – खासदार
  • यशोमती ठाकूर – काँग्रेस नेत्या
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button