AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांना विजयी करा! आमदार प्रताप अडसड यांचे आवाहन

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरनाईक सक्षम असल्याचा दावा; पहिल्या पसंतीचे मत देण्याचे केले आवाहन

अमरावती | सिटी न्यूज

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आमदार प्रताप अडसड यांनी केले आहे. सरकारमध्ये राहून किरण सरनाईक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षकांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना शिक्षकांनी पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केले. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सरनाईक यांना विधान परिषदेत पाठविण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून उमेदवाराच्या समर्थनार्थ आवाहन करण्यात येत असून, आता शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button