BreakingNewscitynewslatestnewss breakingnewsMaharashtraNagpurNagpurPolice

नागपुरात फरार आरोपीला वाहन चोरी विरोधी पथकाने घेतले ताब्यात!

वाडी पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध; गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २०१५ मधील गुन्ह्यातील फरार आरोपीला वाहन चोरी विरोधी पथकाने शोधून काढत ताब्यात घेतले. प्रवीण रामचंद्र बारंगे (वय ३८, रा. प्लॉट क्रमांक १२८/२, विना नगर, दत्तवाडी, नागपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०१५ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम २७९ व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण बारंगे याचा वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस हवालदार रोशन आणि विलास यांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपीबाबत संपूर्ण खात्री करून त्याची वैद्यकीय तपासणी केली. तसेच, पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला अहवालासह वाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

वाहन चोरी विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे जुन्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button