AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

बनियानवर नामांकन दाखल करण्यासाठी पोहोचले उपेंद्र पाटील; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अनोखा संकल्प

अमरावती शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी; सभागृहातही बनियानवर जाण्याचा निर्धार

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा एका उमेदवाराच्या अनोख्या नामांकनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. उपेंद्र बाबाराव पाटील यांनी आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी चक्क बनियान परिधान करून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात हजेरी लावली.

नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी बनियानवर आलेल्या उपेंद्र पाटील यांना पाहून उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण झाले. त्यांच्या या अनोख्या पद्धतीची परिसरात चर्चा रंगली.

शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखा मार्ग

उपेंद्र पाटील यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले. शिक्षकांच्या समस्या सुटेपर्यंत आपण बनियानवरच राहण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतकेच नव्हे तर निवडून आल्यास विधान परिषद सभागृहातही बनियान घालून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघेपर्यंत आपला हा संकल्प कायम राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

नामांकनाच्या निमित्ताने अनोख्या आंदोलनाची चर्चा

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, संघटना आणि अपक्ष उमेदवारांकडून नामांकन अर्ज दाखल केले जात आहेत. मात्र, उपेंद्र पाटील यांनी केलेल्या या अनोख्या नामांकनामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button