amravatiBreakingNewsMaharashtracitynewsFestival News

श्री रुक्मणी गणेशोत्सव मंडळात भक्तिमय वातावरण

बद्रीनाथ मंदिराचा आकर्षक देखावा; लालबागच्या राजाची भव्य मूर्ती विराजमान

अमरावती : शहरातील पारंपरिक आणि श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री रुक्मणी गणेशोत्सव मंडळात यंदाही भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने बद्रीनाथ मंदिराचा आकर्षक देखावा साकारण्यात आला असून, येथे लालबागच्या राजाची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. देखावा आणि गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

श्री रुक्मणी गणेशोत्सव मंडळाला धार्मिक तसेच सामाजिक कार्याची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय संजय बंड यांनी जपलेला सामाजिक आणि धार्मिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सध्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे सांभाळत असून, ते मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

रवी राणा आणि प्रवीण पोटे यांची सदिच्छा भेट

दरम्यान, आज बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी श्री रुक्मणी गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण तायडे यांनी दोन्ही आमदारांचे स्वागत केले.

या भेटीदरम्यान गणेशोत्सवाच्या आयोजनासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसंदर्भात अकोला येथे कृषिमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगितले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री रुक्मणी गणेशोत्सव मंडळात एकीकडे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा होत आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर अकोला येथील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button