citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यावरून वाद; प्रजापती नगरमध्ये तरुणावर चाकूहल्ला!

बबलू बंगाली पांडे जखमी; पळून जाणाऱ्या कुणाल कुकडे आणि रुद्र उर्फ माचो बेंद्रेला पोलिसांनी पाठलाग करून पकडले

नागपूर : नागपूरच्या प्रजापती नगर परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादाचे रूपांतर चाकूहल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे. शिवीगाळ करण्यावरून सुरू झालेल्या वादात बबलू बंगाली पांडे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कुकडे आणि रुद्र उर्फ माचो बेंद्रे या दोघांना अटक केली आहे. जखमी बबलू पांडे यांच्यावर सध्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल कुकडे आणि रुद्र उर्फ माचो बेंद्रे हे एका व्यक्तीसोबत वाद घालत शिवीगाळ करत होते. यावेळी फिर्यादी विमल कुमार सिद्धूप्रसाद आणि जखमी बबलू बंगाली पांडे यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला.

याचा राग आल्याने आरोपींनी जवळील चाकू काढून बबलू पांडे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात बबलू पांडे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांच्या तपास पथकाने त्यांचा पाठलाग करून कुणाल कुकडे आणि रुद्र बेंद्रे या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. रुद्र उर्फ माचो बेंद्रे याच्यावर घरफोडीचा गुन्हा, तर कुणाल कुकडे याच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कारवाई सुरू केली असून, चाकूहल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी, हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राबाबतची माहिती आणि घटनेतील इतर बाबींचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button