citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्राफिक पोलिसांची नजर!

शाळांबाहेर वाहनांची विशेष तपासणी; नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. डीसीपी आदित्य मिर्कलकर यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध झोनमध्ये स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची विशेष तपासणी केली जात आहे.

या मोहिमेदरम्यान शाळांबाहेर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, वाहनाची वैधता तसेच चालकांकडून आवश्यक माहितीची पडताळणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी निर्धारित नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याचीही तपासणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवरही कारवाई केली जात आहे. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत शाळांच्या परिसरात विशेष लक्ष ठेवून वाहनांची तपासणी केली जात आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे, नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांची ही तपासणी मोहीम महत्त्वाची ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button