AmravatiBreakingNewscitynews

अमरावतीत भव्य महादेव कावड शोभायात्रा!

बम बम भोलेच्या जयघोषाने शहर दुमदुमले; झाकिया, पारंपरिक वेशभूषा आणि वारकरी मंडळाच्या सहभागाने भक्तिमय वातावरण

अमरावतीत श्रावण महिन्याच्या भक्तिमय वातावरणात श्री कालभैरव कावड मंडळ गोहर नगर मसानगंजच्या वतीने भव्य महादेव कावड शोभायात्रा काढण्यात आली. बम बम भोलेच्या जयघोषाने शहरातील विविध मार्ग अक्षरशः शिवमय झाले.

आज २३ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या या भव्य कावड शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले.

विविध आकर्षक झाकिया, पारंपरिक आणि सांस्कृतिक वेशभूषा तसेच भक्तिमय वातावरणामुळे शोभायात्रेची रंगत आणखी वाढली. विशेष म्हणजे वारकरी मंडळानेही या शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही कावड विलासनगर येथे दाखल झाली. यावेळी बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात महादेवांच्या कावडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यानंतर गोहर नगर मसानगंज येथील महादेव मंदिरात कावड पोहोचल्यानंतर महादेवांना जलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर महाआरतीने या भव्य कावड शोभायात्रेची सांगता होणार आहे.

श्रावणातील या भक्तिमय सोहळ्यामुळे अमरावतीत शिवभक्तीचा जागर पाहायला मिळाला. बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आणि भाविकांनी भक्तीमय वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button