मणिबाई गुजराती हायस्कूलच्या नव्या कार्यकारिणीची निवड

सीए डॉ. निलेश लाठिया अध्यक्ष, डॉ. नितीन सेठ उपाध्यक्ष; शांततेत निवडणूक प्रक्रिया पार
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मणिबाई गुजराती हायस्कूलच्या नव्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
निवडणुकीत सीए डॉ. निलेश लाठिया यांची अध्यक्षपदी, तर डॉ. नितीन सेठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीए राजेश पटेल यांना १९५ मते मिळाली. दिनेश सेठिया आणि भरत भयानी यांना प्रत्येकी १९१ मते मिळाली. ॲड. निलेश शाह यांना १६९, किशोर कारिया यांना १६४, तर राजू देसाई आणि सिमेश श्रॉफ यांना प्रत्येकी १५९ मते प्राप्त झाली.
याशिवाय अमृत पटेल यांना १५६, तुषार श्रॉफ आणि जितेंद्र दोशी यांना प्रत्येकी १५५, चेतन लाठिया यांना १५१ आणि मुकेश गागलानी यांना १४९ मते मिळून कार्यकारिणीत स्थान मिळाले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी हितेंद्रभाई धावलिया, राजूभाई मंडविया, कुशलभाई पटेल, राजेंद्र पारेख, जीतूभाई आनंदपरा आणि रमेशभाई कामदार यांच्या देखरेखीखाली पार पडली.
निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे समाजबांधवांनी अभिनंदन केले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



