Latest NewsVidarbh SamacharWeather Report

विदर्भात उष्णतेचा कहर! अकोल्यात 43.1°C उच्चांक, नागपूरकर उकाड्याने त्रस्त

विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 41.4 अंशांवर पोहोचले असून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून रस्त्यांवरची वर्दळही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, अकोला येथे सर्वाधिक 43.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून हे राज्यातील सध्याचे उच्चांकी तापमान ठरले आहे. तर ब्रह्मपुरी येथे 39.6 अंश तापमानाची नोंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके व सैल कपडे वापरणे, तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेचा चटका अधिक तीव्र होत असून जनजीवनावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क असून नागरिकांनीही स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button