शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल, तर बुध्दीप्रामाण्यवादी व्हा – प्रा.मधुकर जाधव

विद्यापीठात शहीद दिनानिमित्त व्याख्यानमाला संपन्न
अमरावती (दि. 24.03.2026) – शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल, तर देशहिताचे कार्य करा, राष्ट्रीय एकात्मता, देशाची विविधता जपावी लागेल, वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा लागेल आणि त्यासाठी बुध्दीप्रामाण्यवादी व्हा, अनुकरण करा, पण अंधानुकरण नाही, असे मौलिक विचार प्रा. मधुकर जाधव यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त ‘शहीदांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, अधिसभा सदस्य श्री नितीन टाले, श्री कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.
विषयाची मांडणी करतांना प्रा. जाधव म्हणाले, लाला लजपतराय यांच्या विचाराचा भगतसिंह यांच्यावर मोठा प्रभाव होता. लाला लजपतराय यांच्या अकाली निधनाने ते व्यथित झाले व ज्यांच्यामुळे लाला लजपतराय यांना प्राण गमवावा लागला, त्याचा बदला त्यांनी घेतला. अलेम्ब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे सुध्दा भारतीयांचे विचार ब्रिाटीश सरकारच्या कानापर्यंत पोहचले पाहिजेत, या हेतुने भगतसिंह यांनी बॉम्बस्फोट केला होता, वस्तुत: जीवितहानी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. चंदनसिंह सारख्या ब्रिाटीशांची चाकरी करणा-याला सुध्दा मारण्यात आले होते. भगतसिंह यांनी स्वत:ला अटक करवून घेतल्यानंतर कारागृहामध्ये सुध्दा भारतीयांना दुय्यम वागणूक दिल्या जात होती, त्यासाठी त्यांनी कारागृहातच उपोषण आंदोलन सुरू केले होते. ब्रिाटीश काळात प्रत्येक बाबींसाठी भारतीयांना आंदोलन करावे लागत होते. बाबू गेणू यांनी सुध्दा भारतातील कच्चा माल ब्रिाटीशांना नेण्यास मनाई केली होती. या सर्व बाबींवरुनच क्रांतिकारक, समाजसुधारकांनी देशासाठी किती लढा दिला हे स्पष्ट होते. त्यामुळे आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानकौशल्याचा उपयोग समाजहित, देशहितासाठी करावा. शहीदांचे चरित्र वाचा, विचार आत्मसात करा. ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत रहा, नक्कीच यशस्वी व्हाल, असा सल्लाही प्रा. जाधव यांनी याप्रसंगी विद्याथ्र्यांना दिला.
मार्गदर्शनपर भाषण करतांना अधिसभा सदस्य श्री नितीन टाले म्हणाले, सर्वस्वाचा त्याग करुन तरूण वयातच क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आपण तरुण वयात काय करीत आहोत, हे पाहिले पाहिजे. आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत, त्यांना सामोरे जा. विद्यार्थी सुध्दा परिवर्तन घडवून आणू शकतात, असेही श्री टाले म्हणाले. श्री कैलास चव्हाण म्हणाले, ब्रिाटीशांची सत्ता उलथवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले आहे. अवघ्या तेवीस वर्ष वयात भगतसिंह यांनी अनेक पुस्तके वाचली, अभ्यास केला. लाला लजपतराय यांच्याकडून देशभक्तीचे धडे घेतले. वीर सावरकर यांनी अभिनव भारत संघटना उभारुन देशासाठी लढा दिला. पुस्तके वाचा, स्वप्न पहा आणि पुढे जा असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्याथ्र्यांना केले.
अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, क्रांतिकारकांचे विचार व कार्य आत्मसात करावे लागेल. इतिहासाचे वाचन करावे लागेल. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या विचाराचा वारसा आपल्याला पुढे न्यावा लागेल. विकसित भारतासाठी युवकांचे महत्वाचे योगदान असून त्यासाठी निरंतर प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.
संत गाडगे बाबा, शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी, सूत्रसंचालन भगवान किनाके यांनी, तर आभार डॉ. निलेश कडू यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



