Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग 44 वर भीषण अपघात; कंटेनरची धडक, ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग 44 वर आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात कंटेनरने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


बुधवारी सकाळच्या सुमारास नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग 44 वर कांद्री माईन परिसरातील चिंधाई माता मंदिर जवळ हा अपघात घडला.

जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात कंटेनरने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला.

या अपघातात जखमी व्यक्तीचे नाव रंगनाथ मिश्रा (वय ५०) असे असून, कंटेनर त्याच्या हातावरून गेल्याने त्याचा एक हात निकामी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. टोल व्यवस्थापक अतुल आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजभिये, आशिष चोपकर आणि नितेश नेवारे यांनी तातडीने मदतकार्य हाती घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे दाखल केले.

मात्र, जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी मेडिकल रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून रामटेक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


या अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांचा मुद्दा समोर आला आहे. फरार कंटेनर चालकाला लवकरात लवकर अटक होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button