agricultureAmaravti GraminLatest Newsmelghat

मेळघाट आदिवासी शेतकऱ्यांना ११ बैलजोड्यांचे वाटप

श्रीपंचकृष्ण गोरक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट चा पुढाकार; पारंपरिक शेतीला नवी उभारी

मेळघाट, दि. २० फेब्रुवारी २०२६ :
मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. श्रीपंचकृष्ण गोरक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, चिंचखेड यांच्या वतीने तब्बल ११ बैलजोड्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे पारंपरिक शेती पद्धतीला नवी उभारी मिळणार असून गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महानुभाव पंथाचे ऑल इंडिया अध्यक्ष कारणजेकर महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीभैया जाजोदिया यांच्या हस्ते बैलजोड्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष शंतनु इंगोले, क्षितिज भुयार, प्रणव धसकट, अनिकेत जोशी, राजन अडतिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच उपाध्यक्ष अभिजीत कालबांडे, सचिव हर्षद अडसोड, कोषाध्यक्ष वैभव मोंढे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मेळघाटातील अनेक आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत बैलजोडी मिळाल्याने नांगरणी, पेरणी आणि इतर शेतीकामे सुलभ होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

गौसंवर्धन, शेतकरी मदत आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना आधार देणे हे ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना प्रगतीच्या शुभेच्छा देत समाजातील सर्व घटकांनी अशा सकारात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button