पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हँडबॉल (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 30.01.2026) – सौराष्ट्र युनिव्र्हसिटी, राजकोट येथे 22 ते 26 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हँडबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये सरस्वती कला महाविद्यालय, दहिहांंडाची कु. शितल गावंडे व कु. साक्षी वानखडे, आदर्श महाविद्यालय, धामणगांव रेल्वेची कु. अर्पिता वाघमारे, कु. उज्ज्वला कोटनके व कु. खुशी ठवरे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. रिनचेन डोलमा, कु. अनिता चिमोटे, कु. नंदिनी पंदराम व कु. दिपाली, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. साक्षी माटोडे, श्रीराम कला महिला महाविद्यालय, धामणगांव रेल्वेची कु. कशीश करसे व कु. सलोनी यादव, इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगांवची कु. नंदिनी भगत व कु. तनू काकडे, इंदिरा महाविद्यालय, कळंबची कु. राधिका राऊत, बॅरि. आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेराची कु. राणी सोलंकी, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. साक्षी सुरजुसे, स्व. दादाराव अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालय, धामणगांव रेल्वेची कु. साक्षी राठोड आणि सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीची कु. वैदेही अजबाळे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे 10 ते 19 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



