AmravatiLatest Newspolitics

अमरावती मनपा निवडणूक: शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; नेहरू मैदानात एकनाथ शिंदेंची जाहीर सभा गाजली

अमरावती

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बुधवारी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने अमरावतीतील नेहरू मैदान अक्षरशः गजबजून गेले. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीत शिवसेनेने महानगरपालिकेवर पूर्ण बहुमताचा निर्धार पुन्हा एकदा जाहीर केला.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या सक्तीच्या प्रचाराअंतर्गत आयोजित या जाहीर सभेत माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता मंचावर येताच उपस्थित लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करत, येणाऱ्या काळात अमरावती महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात लाडकी बहीण योजनेचा विशेष उल्लेख केला. ही योजना घर चालवणाऱ्या महिलांसाठी असून, येणाऱ्या काळात माझ्या लाडक्या बहिणी लखपती होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे यांनी आश्वासन दिले की, जर अमरावती महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली तर शहरात

  • नियमित स्वच्छता व्यवस्था
  • दररोज पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
  • बचत गटांच्या हातांना काम
  • सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी
  • आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

नगरविकास खातं माझ्याजवळ आहे, अमरावतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या जाहीर सभेला अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार, माजी आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, भाजपाचे काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आपला जाहीर पाठिंबा दिला, त्यामुळे सभेला आणखी राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button