AmravatiLatest NewsSocial News

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 115व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

‘सेवा ही संकल्प’ अंतर्गत वृद्धाश्रम, अपंग संस्था व वृक्षारोपण

अमरावती, दि. 19 (जिमाका) :
देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 115व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ‘सेवा ही संकल्प’ या संकल्पनेअंतर्गत वर्धापन सप्ताह साजरा करण्यात आला. 15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात बँकेने नफा कमावण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी वलगांव येथील श्री संत गाडगे महाराज परमधाम वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी बँकेच्या वतीने वृद्धाश्रमासाठी प्रवेशद्वाराची कमान, फूड ट्रॉली व सुका मेवा प्रदान करण्यात आला. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक वर्गणीतून किराणा माल, फळे आणि चार सीलिंग फॅन भेट देऊन वृद्धाश्रमातील सोयी-सुविधांमध्ये मोलाची भर घातली.

हा सेवायज्ञ केवळ वृद्धाश्रमापुरता मर्यादित न ठेवता, अमरावती येथील अपंग कल्याण संस्थेलाही 10 सीलिंग फॅन भेट देण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, बँकेच्या 115व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध भागांत 115 वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमांविषयी बोलताना जिल्हा अग्रणी प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी सांगितले की, “सेंट्रल बँक ऑफ इंडिया भविष्यातही समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहील.”

या यशस्वी उपक्रमासाठी मुख्य प्रबंधक दीपक दाभोळे, शीतल मेश्राम, राजकुमार तरटे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button