AmravatiLatest NewsMaharashtra Politics

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी युनायटेड रिपब्लिकन फोरमची पहिली उमेदवार यादी जाहीर

अमरावती

अमरावती महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, युनायटेड रिपब्लिकन फोरमने नगरसेवक उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. डॉ. अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, निष्पक्ष आणि लोकशाही पद्धतीने ही निवड प्रक्रिया राबविण्यात आल्याचा दावा फोरमकडून करण्यात आला आहे.

२०२५–२६ च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोरमने उमेदवार निवडीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. ही निवड प्रक्रिया २२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली. यामध्ये मूल्यांकन समितीमार्फत उमेदवारांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या.

या प्रक्रियेत तरुण उमेदवार, महिला प्रतिनिधी तसेच निवडणूक अनुभव असलेले कार्यकर्ते यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. यासोबतच संबंधित प्रभागांमध्ये यादृच्छिक मतदार सर्वेक्षण करून त्याचे अहवाल मुख्य निवड समितीसमोर सादर करण्यात आले. या सर्व अहवालांचा सखोल अभ्यास करून ११ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य निवड समितीने पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

जाहीर झालेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे —

प्रभाग ४ | जमील कॉलनी – लालखडी
▪️ जावेद अंजुम सर (शजर)
▪️ शमा परवीन शेख अकबर

वॉर्ड १६ | रहमत नगर – अलीम नगर
▪️ सय्यद नसीम
▪️ मोहम्मद रेहान मोहम्मद यासीन (बल्ला)

वॉर्ड १५ | छाया नगर – पठाणपुरा
▪️ नगमा परवीन मोहम्मद तस्वार
▪️ मेघा गुप्ता माहेरा काझीम शेख

विभाग २१ | जुनी बस्ती – बडनेरा
▪️ मिर्झा अन्सार बेग

विभाग ०८ | जोग स्टेडियम – छप्राशीपुरा
▪️ मो. साबीर मोहम्मद शब्बीर फणकर

विभाग १० | बेनोडा – भीमटेकडी – दस्तूर नगर
▪️ ॲड. शीतल गजभिये (तायडे)

विभाग २० | सुतगिरी – समरा नगर
▪️ जितेंद्र श्रीपादराव रामटेके

युनायटेड रिपब्लिकन फोरमचे प्रमुख उद्दिष्ट प्रामाणिक व जबाबदार नेतृत्व घडवणे, सुशिक्षित आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणे, समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे तसेच आंबेडकरी विचारसरणी व संवैधानिक मूल्यांवर आधारित राजकारण करणे असल्याचे फोरमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या दिशेने फोरमने आपली तयारी अधिक तीव्र केली असून, पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या उमेदवारांमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात आणखी उमेदवारांची घोषणा होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button