Amaravti GraminelectionLatest NewsMaharashtra

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणूक : स्ट्रॉंग रूम सुरक्षेसाठी CPI(M)ची तातडीने नेटवर्क जॅमर बसवण्याची मागणी

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत 2 डिसेंबर रोजी झालेली निवडणूक शांततेत पार पडली. निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार होता; मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक निकालाची तारीख 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या बदललेल्या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संशयाची भावना निर्माण झाली असून स्ट्रॉंग रूम सुरक्षेबाबत राजकीय पक्षांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) – CPI(M) यांनी स्ट्रॉंग रूमवर अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुका सचिव मा. शाम शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही प्रकारचा अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये यासाठी तातडीने नेटवर्क जॅमर बसवावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.


CPI(M) ची प्रमुख मागणी

  • स्ट्रॉंग रूम परिसरात नेटवर्क जॅमर बसवणे अनिवार्य करावे.
  • स्ट्रॉंग रूमवर 24 तास देखरेख ठेवण्यास पक्ष कार्यकर्त्यांना परवानगी द्यावी.
  • त्यासाठी कार्यकर्त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे.

निवडणूक निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेविषयी चर्चा वाढली आहे. CPI(M) च्या निवेदनानंतर आता प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button